हवं ते

Posted by Vinay Yadav On

हवं ते



तुला देण्यासाठी म्हणुन
काही नाही माझ्याकडे,
पण जाता जाता एकदा
हवं ते माघुन घे.
खुपश्या आठवनी जपल्या आहेत तुझ्या,
घरातल्या, अंगणातल्या,
चोरुन भेटलो त्या बगेतल्या सुद्दा,
त्यातलीच एखादी निवडुन घे,
पण जाता जाता एकदा
हवं ते माघुन घे.
तुझा एक एक स्पर्श
घर करुन आहे मनात,
विशेष करुन,
पाऊसात जेव्हा आपण
भिजायचो माझ्या अंगणात.
तेवढं पाऊसातलं सोडुन
बाकी सगळे सोबत घे.
पण जाता जाता एकदा
हवं ते माघुन घे.

क्षण आपण एकत्र घालवलेले,
तासन तास गप्पांमधे रंगलेले,
कधी विरहात रडलेले,
आणी कधी उगाच भांडलेले.

आहेत सारे ते माझ्या
श्वासा श्वासात गुंतलेले,
त्यातलाच एखादा गुंता सोडवुन घे.
पण जाता जाता एकदा
हवं ते माघुन घे.