निश:ब्द ही संध्याकाळ

Posted by Vinay Yadav On
निश:ब्द ही संध्याकाळ - मॄत्यु
’येईल रात्र’ म्हणुन वाट केव्हाची पाहते.

सरकली सुर्यकिरणे पाण्यावरुन,
पाणी संधेच्या वा-याने झुळझुळते.
होतं सुखी ऊन त्या पाण्याच्या कुशीत,
आता पाण्याचा विरह अंग-अंग त्याचा जाळते.
निश:ब्द ही संध्याकाळ
’येईल रात्र’ म्हणुन वाट केव्हाची पाहते.

बिलगली पिकली पाने धरतीला,
त्याचं मातीत विलिन होणे राहते.
सुकली काही फ़ुले,
कोणी पाकळ्या पाकळ्याने जग सोडते.
निश:ब्द ही संध्याकाळ
’येईल रात्र’ म्हणुन वाट केव्हाची पाहते.

पिकले माझ्याही आयुष्याचे पान,
हवेचा एका झोक्यानेही अश्यावेळी निभावते.
निश:ब्द ही संध्याकाळ
’येईल रात्र’ म्हणुन वाट केव्हाची पाहते.