असाव कुणीतरी......
आपल्या हाकेला 'ओ' देणार.....
रिमझिंत्या पावसात हळूच छत्रीत बोलावनार..
असाव कुणीतरी......
आपल्या सोबत चालणार..
चांदण्यात फिरताना हातात हात घेणार..
असाव कुणीतरी......
कधी वाद घालणार..
खोटा रुसवा आणून, पुन्हा आपल्यावरच रागवणार..
असाव कुणीतरी......
मनमोकळ बोलणार..
काहीही न सांगता, अगदी मनातल ओळखणार..
असाव कुणीतरी......
खूप काही विचारणार..
लहान लहान गोष्टीसाठी शपथ घालणार..
असाव कुणीतरी...................
विनय यादव