रिमझीमणा-या पाऊसात

Posted by Vinay Yadav On


रिमझीमणा-या पाऊसात

रिमझीमणा-या पाऊसात
तिला मनसोक्त असतं भिजायचं,
त्याला पसंत नसतं म्हणुन
नुसतं खिडकीतुनच पाऊस अनुभवायचं.


त्याच्याही मनात असतं
पाऊसाच्या ओल्या मिठीत तिला घ्यायचं.
पण, सुरवात तिनेच करावी म्हणुन
पेपर मधे डोकं खुपसुन वाट पाहायचं.
तिलाही न राहवुन तिनं
पाऊसाचं पाणी हळुवार त्याच्यावर उडवायचं,
त्यालाही एवडंच हवं असतं
मग त्यानं खट्याळ स्पर्श करुन उगाच तिला छेडायचं.

बस छेडल्याचं एक कारण !
अन तिनं लागलीच रुसायचं ?
अर्धवट भिजलेल्या अवस्थेत,
पलंगावर जाउन बसायचं.
रुसवा तिझा काढायचा म्हणुन
त्यानं तिला अलगदच उचलुन घ्यायचं.
तसंच घेऊन तिला पाऊसात
अंगणभर स्वत: भोवती गोल-गोल फ़िरायचं.

मग हळुच तिनं लाजुन
त्याच्याच कुशीत तोंड लपवायचं,
अहो, त्याचं काय नि आपलं काय
रिमझीमणा-या पाऊसात
जोडीनं असंच तर असतं भिजायचं.मुली