शिक्षणासाठी उंबरठा ओलांडताना…

Posted by Vinay Yadav On
शिक्षणासाठी उंबरठा ओलांडताना
होते आईचे डोळे पान्हावलेले
वडीलांचे ओठ नि:शब्द,
आजी होती पदर सावरीत
आजोबा तर होते स्थब्ध.
निघताना प्रत्येकाने
काही ना काही दिलेच होते,
मलाच काही
सावरायला जमत नव्हते.
आईची माया होती,
आजीची आशा.
वडीलांचा आधार होता,
अन आजोबांची मनीषा.
जड झालं होतं अंत:करण,
निघायच्या विचाराने भरुन आलं होतं मन.
ओल्या डोळ्यांनी आई होती म्हणाली
शिक्षणासाठी उंबरठा ओलांडताना…
…कधी मागे वळु नकोस
आयुष्यात पुढं चालताना !!!