तुझ्यात गुंतुन मी, स्वत:ला सोडवत राहीलो.
वळण राहीले मागे कधीचे, मी तसाच चालत राहीलो.
तुझ्या प्रत्येक स्पर्शाने श्वास माझा रोखला.
बंधीस्त माझे विचार, तुझ्या मोकळ्या स्वभावात गुदमरुन राहीलो.
प्रिती तुझी कळुन ही, न वळली मज कधी.
प्रेमात चिंब तु भीजलेली, अन मी पाषाण कोरडा राहीलो.
तुझ्यात गुंतुन मी, स्वत:ला सोडवत राहीलो।