आठवतात ते क्षण

Posted by Vinay Yadav On

किती सहजपणे होतं विचारलंस
“देशील का मला आयुष्यभर साथ ?”

झुकलेले तुझे डोळे नी
गुलाब देणारा तुझा थरथरनारा हाथ.
आठवतात ते क्षण
किती सहजपणे होते घेतलेस
माझा तो नकार,
हसण्याचा तुझा प्रयत्न नी
भिजलेले डोळे तुझे चुकार.
आठवतात ते क्षण
शेवटचं म्हणुन
मागीतलेलं तुझं एक मागणं,
“आयुष्यभर तर नाहीस, देशील मज तु
हाथ धरुन पाच पावलांच चालणं?”
आठवतात ते क्षण…