…तु ये

Posted by Vinay Yadav On

…तु ये

श्वास उष्टा होईल श्वासाने
जवळ इतक्या लाजुन तु ये,
शहारावे अंग माझेही
स्पर्शामध्ये तेवढे अंतर ठेऊन तु ये.
घ्यायचा आहे गंध तुझा
कळी सारखी खुलुन तु ये,
विसरायचे आहे जगाला मिठीत तुझ्या
ऊब प्रेमाची एवढी घेऊन तु ये.
सावळ तुझ्या कांतीवर
सौभाग्य लेनं माझं लेऊन तु ये,
फिरलेही असतील पाऊलं तुझी घरभर
पण, एकदा उंबरट्यावरचं माप ओलांडुन तु ये.