माणसांच्या भुतांमध्ये मी जिवंतपणा शोधत राहीलो,
माणूस म्हणता येईल असा एक जीव शोधत राहीलो.
स्वत:ची जीत नाही, पण दुस-याची हार महत्वाची.
अशा ’संधी साधु’ मध्ये मी संधी ’शोधु’ म्हणणारा शोधत राहीलो.

चढाओढीचाही अर्थ न समजला, चढुन ओढायचे की ओढुन चढायचे,
तरी माझेच पाय ओढणा-यास मी नमस्कार करुन राहीलो.

जिवंतपणा शोधता शोधता, मीही ’भुत’ झाल्याचं जाणंवलं,
माझ्याच ’नि:स्वार्थ’ चा
नि’ हरवला, अन मी हातातल्या ’स्वार्थ’ कडे पाहत राहीलो.

’माणसांच्या भुतां’मध्ये मी जिवंतपणा शोधत राहीलो,
माणूस म्हणता येईल असा एक जीव शोधत राहीलो.