जाताना तु…

Posted by Vinay Yadav On
जाताना तु…

जाताना तुला पाहताना,
वाटले, काहीतरी हरवले माझे.
हे ह्रुदय तर धडधडतय पण,
जीव तर गमावले माझे.
जाताना तु ठेचाळलीस,
पण पाय रक्ताळले माझे
नकळत सावरायला तुला,
हाथ सरसावले माझे.
जाणा-या पाठमो-या आक्रुतीला पाहुन तुझ्या,
डोळे पान्हावले माझे.
जाताना जीवंतच सोडलीस मला,
पण, प्राण तर तुझ्यासोबतच गेले माझे