समर्पीत प्रेम

Posted by Vinay Yadav On
समर्पीत प्रेम
मी एकदा सागराला
विचारावं म्हणतो,
उफळणारी लाव्हा मनात असताना
वरून एवढा कसा शांत असतो ?
त्यालाही कुठेतरी
सलत असेल मनात,
निट नाही दिसणार म्हणुन
रडत नसेल तो चार जणांत.
स्वत:च्याच खारटपणाबद्दल
विचार करत बसतो,
अन आतुरतेने भेटायला आलेल्या
सरीतेलाच विसरतो.
विचार करत असेल तीही
बोलता आले असते तर बरे झाले असते,
शब्दांच्या होडया करुन
लाटांवर तर तरंगवले असते.
मी एकदा सागराला
विचारावं म्हणतो,
एवढे समर्पीत प्रेम जवळ असताना
हा पाठफिरवुन चंद्राच्या मागे का धावतो.