तुझे दुरुन पाहणे,

Posted by Vinay Yadav On
तुझे दुरुन पाहणे,
भिडताच नजर डोळ्यांचे झुकणे.
कधी नजरेआड होता,
होऊन वेडेपीसे शोधणे.
तुझे दुरुन पाहणे,
नाक हलकेच मुरडणे.
पाहुन मी हसता,
दात ओठांत रुतणे.
तुझे लटके झटके,
सारे प्रेमाचे बहाणे.
मज वेड लाऊन जाई,
तुझे दुरुन पाहणे