थंडी

Posted by Vinay Yadav On

थंडी

ऊन म्हंटले की
थंडीला ’काप’ भरताना पाहीलंय,
ऊन कोवळं असलं तरी
थंडीला धुक्याच्या मागे लपताना पाहीलंय.
सुर्य उगवला की
थंडीला घेउन धुक्याला जाताना पाहीलंय,
त्यांच्या प्रेमाचं हे कोडं सुटत नाही म्हणुन
कधी कधी सुर्यालाही जळताना पाहीलंय.
पुन्हा संध्याकाळी दोघांना
अंगणात माझ्या बागडताना पाहीलंय,
धुक्याने हळुच मिठीत घेतल्यावर
लाजुन थंडीला ’गुलाबी’ होताना पाहीलंय.