मन म्हणे मज कधी, चल जाऊ पुन्हा मागे,
चालु एकटे दुकटे, कधी आठवणींच्या संगे,
थोडीशी सोबत, थोडासा प्रवास,
नसतील कोणी, फक्त आपणच दोघे,
मन म्हणे मज कधी, चल जाऊ पुन्हा मागे.
वाट बिकट कधी, कधी मोकळे ते रान,
पुन्हा तेच काटे-कुटे, पुन्हा तेच फुलं-पानं.
पुन्हा भेटतील वाटेत, क्षण जगलेले सारे,
चुकलेला श्वास, पुन्हा जगुन तु घे.
मन म्हणे मज कधी, चल जाऊ पुन्हा मागे.
कुठल्याश्या वळणावर, मागे राहीलेला सोबती,
त्याला विसरुन कसा, अरे धावलास किती ?
वेळ सरल्यावर कळले, होतो एकटा मी इथे,
सुटलेला तो हाथ, पुन्हा सोबत तु घे.
मन म्हणे मज कधी, चल जाऊ पुन्हा मागे,
चालु एकटे दुकटे, कधी आठवणींच्या संगे.