मी तुझ्या ग कुशीत

Posted by Vinay Yadav On
मी तुझ्या ग कुशीत,
श्वास रुतला श्वासात.
ओठ भिडले ओठाला,
केवढा काहुर तो मनात.

तुझे गरम उसासे,
तनी पेटवे वनवा.
मी विरघळलो तुझ्यात,
जणु कापुर जळावा.

तुझी कोमल ग कांती,
त्याला हलकासा सुगंध.
उर भरुन श्वास,
करी मजला बेधुंद.

आता राहवेन मज,
थांबव तुझा हा लाडिवाळ.
ऎन रंगात आपला
आला मिलनाचा खेळ