कविता कशी असावी…

Posted by Vinay Yadav On

कविता कशी असावी…

तिच्यात फक्त चार शब्द नसावी,
चौघांच्या मनाला स्पर्श करणारी शक्ती असावी.
कविता कशी असावी…
कविता नुसती कविता नसावी,
लेखकाची ती प्रेयसी असावी.
कविता कशी असावी…
तिच्यात नुसतं आशय नसावं,
आशय स्पष्ट करणारं मनही असावं.
कविता कशी असावी…
जशी एक लावण्यवती स्त्री असवी,
जिला श्रोत्यांचं सौंदर्य लाभावं.
जिच्यात वचकांनी मित्र शोधावं,
नि लेखकांनी आपलं प्रेम जपावं.
कविता कशी असावी…
समजलं असेल तर ’तु’झ्यासारखी असावी,
नाही तर माझ्या या ’प्रेयसी’ सारखी असावी.