आम्हा मराठी वाल्यांना.....

Posted by Vinay Yadav On
आम्हा मराठी वाल्यांना इतर कुठल्याही भाषे बाबत कधीच दुस्वास नव्हता व नाही ही !. आमचा प्रयत्न आहे तॊ आपली मूळ जी मराठी मातृभाषा आहे तिचे अस्तित्व जतन करण्या साठी फक्त धडपड ! कशाला, फार दूर नकॊ जायला आधल्या पिढीतले मराठी वाङमय कींवा अगदी घरातली बोली व आताच्या पिढीतील जर तपासले तर काय दिसेल ?..विषयातील फरक मी समजू शकतॊ पण भाषेचा बाज शब्दांसह का बदलावा ?
ब्रिटीश अमदानीत अनेक पाद्री इथे येवून मराठी शिकले व मराठीतून लिखाणही केले पण एखाद्या रे.टिळकां खेरीज बाकीच्यांचे लिखाणाला मराठीचा सुगंध येत होता का? कारण भाषा ही नुसती भाषा कधीच नसते तर त्यातून त्याचे मराठीपण दिसते व ते असणे हे ही महत्वाचे असते. जे मराठी लोक इंग्रजीतून लिहितात त्यांची ओळख वाचक मराठी म्हणूनच ठेवतो की तो काय लिहीतो ह्यावर ?
महाराष्ट्रातील इतर भागातील मराठी भाषा ही मराठीच आहे त्यात दुमत असण्याचे काहीही कारण नाही . मग तसे म्हणाल तर दर बारा कोसावर भाषा बदलते ! प्रत्येक भाषेचा एक बाज असतो. तो जो पर्यंत टिकला जातॊ, त्या त्या भाषेतून जो पर्यंत तो सुगंध भरलेला असतो तो पर्यंत ती भाषा, ती माणसे व पर्यायाने तो प्रांत टिकून रहातॊ. जेव्हा आम्ही भारताच्याही बाहेर जातॊ तेव्हा भारतातील कुठलीही भाषा आपल्याला सर्वात जवळची वाटते कारण तेथे मग आम्ही भारतीय असतो…. पण इथेच शेजारील माणूस मराठी असला तरी आम्ही जेव्हा हिंदी किंवा अन्य भाषेत एकमेकाशी बोलतो त्याला काय म्हणायचे ?