इंग्रजी

Posted by Vinay Yadav On

इंग्रजीच्या नादापाई झाला मराठीचा डब्बा गोल


मराठी माणसा आता तरी तू मराठीतून बोल...

इंग्रजीच्या पेपरात होऊन जाते वर्ग सारा पास
पण मराठीचा पोरगा होतो मराठीत नापास...

प्रेम करतो तुझ्याशी म्हटले की पोरगी समजते शेंबडा
अन आय लव यु म्हटल्यावर मनात मारते उड्या...

माय झाली मॉम आणि बाप झाला आता ड्याड
रेव्ह पार्टीत नाचून श्यान पोर झाली मॅड...

भांडण करते बायको घरात बाबुला इंग्रजी शाळेत टाका
मराठी माणसापासून आहे खरा मराठी भाषेला धोका...

मराठी इसरत चालल शाळेतले शिक्षण
मराठी औक्सीजनवर अन चालू आहे इंग्रजीचे रक्षण...

ज्ञानोबा तुकोबाची अभंगवाणी, आठवा मराठीचा गोडवा
मराठी माणसाचे नवीन वर्ष म्हणजे असतो गुडी पाडवा...