तु अशी पावसात भिजायची

Posted by Vinay Yadav On

तु अशी पावसात भिजायची
तु अशी पावसात भिजायची
स्वत:चीच ओली काया पाहुन,
मनातुन थोडीशी लाजायची.
पापण्यांवर साठलेले थेंब
गालावर ओघळायला तरसायचे,
भिजलेल्या केसांतुन
जणु मोती खाली टपकायचे.
तुला सवरताना पाहुन,
असं पावसानेही लाज सोडायची ?
जेव्हा
तु अशी पावसात भिजायची.
तुला बिलगुन वारा
कसा अल्लड वागायचा,
त्याच्याच नकळत तो
माझ्या भावनांशी खेळायचा.
तुलाही कळले नाही कधी
तेव्हा अवस्था माझी कशी व्हायची,
जेव्हा
तु अशी पावसात भिजायची.
तु नि:शब्द मी नि:शब्द
उगाच काहीतरी शोधायचे,
थरथरणारे स्पर्श एकमेकांचे
मुकपणे ऐकायचे.
सरं काही शांत शांत पण
तुझी झुकलेली नजर बोलायची,
जेव्हा
तु अशी पावसात भिजायची.
स्वत:चीच ओली काया पाहुन,
मनातुन थोडीशी लाजायची.
जेव्हा
तु अशी पावसात भिजायची