मी खून केला - असा आरोप तुम्ही करू शकाल. माझी समजूत कमी पडली - असेही म्हणू शकाल. आपण सर्व कधीकधी दुबळे असतो. पण खोटेपणाने, आव आणून वागणे - हा गुन्हा मी कधीच केला नाही....................................................... मी गर्दीत असतो पण तरीही एकाकी असतो . मी मित्रांच्या गराड्यात रमतो .पण तरीही मला एकटा रहायला आवडत. मी खुप बोलतो पण तरीही मला गप्प बसून रहायला आवडत. मला आजुबाजुला माणस लागतात,पण तरीही मी माणसाना टाळतो . मला हसायला खुप आवडत,पण तरीही डोळ्यातून पाणी काढायला मी निम्मित शोधत असतो. माझ जीवनावर प्रेम आहे आणि तरीही मी चोरून मृत्यूची वाट पाहतो.