प्रेमासाठि जगाव………..
प्रेमाखातर मराव…………….
तिच्या एका हास्यावरती
अवघं विश्व हरावं
अन अश्रुच्या थेंबालाहि
डोळ्यात स्वत:च्या घ्यावं….
दुःखाचे भागी होऊन ….
सुख तिच्यावर उधळाव………………
आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव……….
तु आणि मी हे व्याकरण
प्रेमात कधीच नसावं………….
आपलेपणाच्या भावनेतच
सार मी पण सराव…..
एकमेकांच होऊन
एकमेकांना जपाव………
आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव……….
मधुर तिच्या आठवणीमध्ये
रात्र - रात्र जागावं……….
अन चुकून मिटताच पापण्या
स्वप्नात तिने यावं..
बहरल्या रात्रीत चांदण्या
तिच्या विरहात झुराव…….
पण खरच……………..
आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर करावं……….
आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव……….
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे………… !
कळत नाही तुज बरोबर की मी कुठेतरी चुकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे………… !
BA करून Bad जालो MA करून Mad जालो,
सुखाच्या शोधात मी फक्त फक्त Sad जालो,
शिकतो तरी लोक म्हणतात मी कुठेतरी हुकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे………… !
किती सहज म्हानाली होतीस की 'तुला लागणार का नोकरी..?
नोकरीच नाही तुला तर कोण देणार छोकरी..?
तुज्याविना, नोकरिविना मी मात्र सुकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे………… !
तुजा मुलगा मामा म्हणतो याच थोड वाईट वाटत,
तुज्या नवरयाच साध शेकहैण्ड मला जबरदस्त फाइट वाटत,
हसरा हसरा संसार तुजा रडता रडता बघतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे………… !
मला बक्षीश मिळाले की तूच टाळ्या वाजवायची,
सर्वांदेखत अभिनन्दन करून मला मात्र लाजवायची,
तुज्याविना कित्येक सत्कार आज गळ्यामधे टाकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे………… !
किती बोलायचो आपन बोलण्यावर बंधन नसे,
मी जालो विस्तव की तुज्या शब्दात चन्दन असे,
आता केवळ ओठवरती मी कुलुप ठोकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे………… !
बाप राब राब राबतोय मायचे हाल सांगत नाही,
उगाच तुला माज्यासाठी सहानुभूति मागत नाही,
फी साठी पार्ट टाइम जॉब करून रोज रोज थकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे………… !
माज्या गळ्यात पडलाय नुसता वचनांचा नाग,
नोटांच्या बंडलानी लागली शिक्षनाला आग,
तरीही या अग्निकुंडामधे स्वताला जोकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे………… !
नोकरी नाही, भाकरी नाही, एवढाच गुन्हा नसतो,
थोडा विश्वास ठेवायचा होता माज्या अंगातही होत रक्त,
येओ आता वादले कितीही, दिवा माजा टिकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे………… !
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे………
उठ तरुणा उठ आता
तुला कसले भय आहे
भिक मागायला लाग
तुझे लग्नाचे वय आहे
कुठे तरी गाठ तू
अडलेला मुलीचा बाप
त्याच्या मागे लाग तू
होउन अस्तनीतला साप
सारे बळ एकवटून
कर तू असा हल्ला
आयुष्याच्या कमाईवर
त्याच्या तू मार डल्ला
पुत्ररत्न जन्म घेतला
आता फेड पांग तू
काय तुझी किंमत
वधूपित्याला सांग तू
तुझ्या आईबापाच्या
नवसाला पाव तू
तिच्या आईबापाला
भिकेला लाव तू
मागताना जमले तर
मान तुझी ताठ ठेव
काय मागनार आहे
यादी तेवढी पाठ ठेव
मागायचे ते माग तू
त्यात कसली लाज
हिच तर वेळ आहे
दाखवायला तुझा माज
तुझी कर्तबगारी काय
हा मुद्दा गौण आहे
विचारलेच तर सांग
आज माझे मौन आहे
लुटताना तू त्यांना
असे लुटले पाहीजे
तिच्या बापाचे धोतर
कशाला सुटले पाहीजे?
मर्दानगीचा असा काही
एक बाजार मांड तू
कवडी कवडीसाठी
जीव तोडून भांड तू
लिलावच कर तुझा
मालच तसा खास तू
माणुसकीच्या नावाला
का़ळीमा फास तू
"मला काही नको पण
आई बापाची ईच्छा आहे"
कारण काही असो
त्यांच्या मागे पिच्छा आहे
शेवटी मात्र एक
घासलेटचा डबा माग तू
उशीर मुळीच नको
आत्ताच तयारीला लाग तू
तुला काहीच कसं वाटत नह्व्त ………..
तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं
कधी मी जिंकावं म्हणून तुला एकदा तरी हरताना पाह्यचं होतं
तुझ्या वाटेवर शिणलेल्या त्या डोळ्यांना
माझ्या आठ्व्हनिनी तुझ्या डोळ्यात पाणी पाह्यचं होतं
तुला नुसतं त्या हिरव्या शालूत पाह्यचं नह्व्त
तर तुझ्या हातावर काढलेल्या म्हेन्दीत माझं नाव शोधायचं होतं
तुझ्या हातात भरलेला हिरव्या चुडया सोबत
तुझ्या कपाळी माझ्या नावचं कुंकू लेह्लेलं पाह्यचं होतं
चार चौघात तुला माझी म्हणून मिरवायचं नह्व्त
तर महाबळेश्वरच्या त्या गुलबी थंडीत हि फिरवायचं होतं
पण तेव्हा तुला माझ्या जीवाशी खेळताना काहीच कसं वाटत नह्व्त
काहीच कसं वाटत नह्व्त …………………
एकदा तिला सहज म्हट्ल,
तु सोबत असलिस कि मला जग छोट वाट्त,
लगेच म्हणाली विकत घेउन टाक,
मि सोबत नसले कि ज्यास्त भावात विकुन टाक.
* एकदा तिच्या जवळ बसुन
तिला म्हट्ल,
तुझे डोळे खुप खोल आहेत.
चावट पणे म्हण्ते कसे .
थोडा लांब सरकुन बस पडशील
. ….तिला म्हट्ल
पण मला पोहता येत
म्हन्ते कशी.
प्रयत्न करुन बघ
कित्येकाना असच वाट्त होत.
* तिला एकदा सहज विचारल
तुल भिति नाहि वाट्त
आपल्याला कोणि बघेल याचि.
काय म्हणालि असेल ?
वाट्तेना कोणि बघेल याचि!
आणि कुणिहि बघत नाहि याचि हि.
तू इथून दूर गेल्यानंतर,
अनेक वाटा माज्या आहेत,
पण पावला पावलावर
आठवणी मात्र तुज्याच आहेत….
व्यक्ती जेवढी दुरावते
आठवनी तेवढ्याच जवळ येतात.
विसरायचा प्रत्येक प्रयत्न
मनाला दंश करुन जातात.
खोल मनात तशीच राहते.
सगळे कही जुने जुने,
पण वेदना नवीन देत जाते.
अर्थ याला राहातच नाही,
आठवनींचे ढग दाटुन आले तरी
डोळ्यातले अश्रु गालावर ओघळतच नाही.
पण, हा रोजचा “अबोला” मात्र सलतं.
ओठ हसत असले तरी
दुखतं किती ते मनालाच कळतं.
दुखतं किती ते फ़क्त मनालाच कळतं…
व्यक्ती जेवढी दुरावते
आठवनी तेवढ्याच जवळ येतात.
विसरायचा प्रत्येक प्रयत्न
मनाला दंश करुन जातात.
सगळे कही जुने जुने,
पण वेदना नवीन देत जाते.
अर्थ याला राहातच नाही,
आठवनींचे ढग दाटुन आले तरी
डोळ्यातले अश्रु गालावर ओघळतच नाही.
पण, हा रोजचा “अबोला” मात्र सलतं.
ओठ हसत असले तरी
दुखतं किती ते मनालाच कळतं.
दुखतं किती ते फ़क्त मनालाच कळतं
चांगल्या चांगल्या मुलांना
वेडयात काढतात या मुली.
दादा - भैय्या म्हणतात मुली,
पण आपल्याच वडिलांना
काका का म्हणतात या मुली?
लाइन मारतोय म्हणतात मुली,
मग नाहीच बोललो की
शाइन मारतोय का म्हणतात या मुली?
तरी चिव चिव चिव चिव खुप करतात मुली,
जेव्हा खरंच बोलण्याची गरज असते….
तेव्हा नजर खली करुन रुमाल का खराब करतात या मुली ?
तरी चिखल पाहुन नाक मुरडतात मुली,
थंडी गुलाबीच चांगली असते म्हणतात
मग २-४ स्वेटर घालुन सुद्दा कुडकुडतात का या मुली?
चांगल्याच भडकतील या मुली
मग (कदाचित) विचार करुन मनात
थोडं तरी बरोबर आहे म्हणतील या मुली…..
तिला मनसोक्त असतं भिजायचं,
त्याला पसंत नसतं म्हणुन
नुसतं खिडकीतुनच पाऊस अनुभवायचं.
पाऊसाच्या ओल्या मिठीत तिला घ्यायचं.
पण, सुरवात तिनेच करावी म्हणुन
पाऊसाचं पाणी हळुवार त्याच्यावर उडवायचं,
त्यालाही एवडंच हवं असतं
मग त्यानं खट्याळ स्पर्श करुन उगाच तिला छेडायचं.
अन तिनं लागलीच रुसायचं ?
अर्धवट भिजलेल्या अवस्थेत,
पलंगावर जाउन बसायचं.
त्यानं तिला अलगदच उचलुन घ्यायचं.
तसंच घेऊन तिला पाऊसात
अंगणभर स्वत: भोवती गोल-गोल फ़िरायचं.
त्याच्याच कुशीत तोंड लपवायचं,
अहो, त्याचं काय नि आपलं काय
रिमझीमणा-या पाऊसात
जोडीनं असंच तर असतं भिजायचं.मुली
हवं ते
काही नाही माझ्याकडे,
पण जाता जाता एकदा
हवं ते माघुन घे.
घरातल्या, अंगणातल्या,
चोरुन भेटलो त्या बगेतल्या सुद्दा,
त्यातलीच एखादी निवडुन घे,
पण जाता जाता एकदा
हवं ते माघुन घे.
घर करुन आहे मनात,
विशेष करुन,
पाऊसात जेव्हा आपण
भिजायचो माझ्या अंगणात.
तेवढं पाऊसातलं सोडुन
पण जाता जाता एकदा
हवं ते माघुन घे.
तासन तास गप्पांमधे रंगलेले,
कधी विरहात रडलेले,
आणी कधी उगाच भांडलेले.
श्वासा श्वासात गुंतलेले,
त्यातलाच एखादा गुंता सोडवुन घे.
पण जाता जाता एकदा
हवं ते माघुन घे.
पाणी संधेच्या वा-याने झुळझुळते.
होतं सुखी ऊन त्या पाण्याच्या कुशीत,
आता पाण्याचा विरह अंग-अंग त्याचा जाळते.
निश:ब्द ही संध्याकाळ
’येईल रात्र’ म्हणुन वाट केव्हाची पाहते.
त्याचं मातीत विलिन होणे राहते.
सुकली काही फ़ुले,
निश:ब्द ही संध्याकाळ
’येईल रात्र’ म्हणुन वाट केव्हाची पाहते.
हवेचा एका झोक्यानेही अश्यावेळी निभावते.
निश:ब्द ही संध्याकाळ
’येईल रात्र’ म्हणुन वाट केव्हाची पाहते.
पण पाय रक्ताळले माझे
नकळत सावरायला तुला,
हाथ सरसावले माझे.
सबंध आयुष्यच…
नव्हे !
आयुष्याच्या वेलीवरचं
अर्धवट उमललेलं फुल,
…म्हणजे प्रेम.
त्या अर्धवट उमललेल्या फुलाच्या
नाजुक पकळ्या
…म्हणजे प्रेम.
त्या पकळ्यांवर साठलेले
टपोर दव म्हणजे प्रेम.
टिपुर, चमकदार, तेवढंच तेजस्वी.
अहं, हात नको लाऊस.
सांगीतलं ना, नाजुक असतं ते.
त्या दवावर पडलेली सुर्यकिरणं
त्यामुळे खुलुन दिसणारं
दवचं ते सौंदर्य
…म्हणजे प्रेम.
पण शेवटी,
प्रेम म्हणजेच प्रेम !
तुला सवरताना पाहुन,
असं पावसानेही लाज सोडायची ?
जेव्हा
तु अशी पावसात भिजायची.
कसा अल्लड वागायचा,
त्याच्याच नकळत तो
माझ्या भावनांशी खेळायचा.
तुलाही कळले नाही कधी
तेव्हा अवस्था माझी कशी व्हायची,
तु अशी पावसात भिजायची.
ओल्या ओठांवर विरघळले क्षण,
लाजलीस अशी खुब तु
गालावर गुलाबी खुलले क्षण.
शहा-यात तुझ्या थरारले क्षण,
बंद डोळ्यांच्या त्या
नजरेत तुझ्या विखुरले क्षण.
धुंद श्वासात तुझ्या मोहरले क्षण,
आयुष्यभर जपावे मी,
असे
मिठीत तुझ्या अडकले क्षण…
कविता कशी असावी…
चौघांच्या मनाला स्पर्श करणारी शक्ती असावी.
लेखकाची ती प्रेयसी असावी.
तिच्यात नुसतं आशय नसावं,
आशय स्पष्ट करणारं मनही असावं.
जशी एक लावण्यवती स्त्री असवी,
जिला श्रोत्यांचं सौंदर्य लाभावं.
जिच्यात वचकांनी मित्र शोधावं,
नि लेखकांनी आपलं प्रेम जपावं.
मैत्रीचा बोन्साय झालाय
विचारावं म्हणतो,
उफळणारी लाव्हा मनात असताना
वरून एवढा कसा शांत असतो ?
अन आतुरतेने भेटायला आलेल्या
सरीतेलाच विसरतो.
बोलता आले असते तर बरे झाले असते,
शब्दांच्या होडया करुन
लाटांवर तर तरंगवले असते.
विचारावं म्हणतो,
एवढे समर्पीत प्रेम जवळ असताना
हा पाठफिरवुन चंद्राच्या मागे का धावतो.
थांबलेले क्षण !
भावनांचा कल्लोळ.
पण जिवाची तळमळ.
स्वत:चाच उडलेला गोंधळ.
अन माझे…
… थांबलेले क्षण !
मी प्रेम करत नाही तुझ्यावर !
पण होय… तु मला आवडतेस.
याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यावर प्रेम करतो.
मला कोणाचं बोलणं आवडतं, कोणाचं चालणं.
कोणाचे डोळे आवडतात, तर कोणाचं हसणं.
याचा अर्थ असा नाही कि मी त्या सा-यांवर प्रेम करतो.
आवड ’मर्यादीत’.
म्हणुनच त्याला विशेषणांची ’गरज’ आहे.
उगाच का म्हणतो आपण,
थोडं आवडतं… जास्त आवडतं.
कधी म्हणताना ऎकलंय ?
“माझं थोडंसच प्रेम होतं !”
आयुष्यभर एखाद्याची सोबत करावीशी वाटणं,
आयुष्याच्या टोकापर्यंत त्याच्या सोबत चालणं !
मग वाट कशीही असो,
आणी तुझ्या सोबत आयुष्य वाटुन घ्यावं
असंतर मला कधीच वाटलं नाही.
तु मला आवडतेस, तुझ्या दिसण्यामुळं !
नव्हे.. तर तुझ्या असण्यामुळं.
नुसतं असण्यामुळं म्हणण्यापेक्षा….
’सोबत असण्यामुळं.’
बस्स ! अशीच सोबत रहा.
कारण…
तु मला आवडतेस.
माणसांच्या भुतां’मध्ये मी जिवंतपणा शोधत राहीलो,
माणूस म्हणता येईल असा एक जीव शोधत राहीलो. स्वत:ची जीत नाही, पण दुस-याची हार महत्वाची.
अशा ’संधी साधु’ मध्ये मी संधी ’शोधु’ म्हणणारा शोधत राहीलो.
’चढाओढी’चाही अर्थ न समजला, चढुन ओढायचे की ओढुन चढायचे,
तरी माझेच पाय ओढणा-यास मी नमस्कार करुन राहीलो.
जिवंतपणा शोधता शोधता, मीही ’भुत’ झाल्याचं जाणंवलं,
माझ्याच ’नि:स्वार्थ’ चा ’नि’ हरवला, अन मी हातातल्या ’स्वार्थ’ कडे पाहत राहीलो.
’माणसांच्या भुतां’मध्ये मी जिवंतपणा शोधत राहीलो,
माणूस म्हणता येईल असा एक जीव शोधत राहीलो.
…तु ये
फिरलेही असतील पाऊलं तुझी घरभर
पण, एकदा उंबरट्यावरचं माप ओलांडुन तु ये.
’कांदा पोहे’ संपन्न झाला.
अन वाटले मला,
जणु हल्ला माझ्या ’उनाड’ स्वातंत्र्यावर झाला.
त्याचा ’आत्ताच उठलो’ म्हणुन
तिथे पाहुण्यांच्या ’दारात’ निरोप आला.
जसे भरवश्याच्या म्हशीला (इथे रेड्याला) टोणगा,
अन सा-या मोठ्यांमध्ये माझ्या एकट्याचा ’पोरग्या’ झाला.
त्या नंतर कुठे मुलीला ’चालवण्या-बोलवण्याचा’ योग आला,
सा-यांचे प्रश्न संपल्यावर प्रश्नाच्या अपेक्षेने माझ्याकडे पाहीले.
(कुठला प्रश्न आठवतो तेवढ्यात !)
क्षणभर माझ्याच चेह-याचा प्रश्नचिन्ह झाला.
सा-यांचे संपले म्हणुन शेवटी शेवटी
मी ’न चावता गिळता घास’ घेतला
’चहा मी घेत नाही’ म्हंटल्यावर
माझी ’निकोटिन’ पेक्षा ’प्रोटिन’ची गरज त्यांना जाणवली असेल,
कारण कॊफी ऐवजी आतमध्ये ’बोर्नविटा’ तयार झाला.
miscall देन्याचा सपाटा केव्हाच केलेला सुरु,
’फोन बंद ठेव’ म्हणुन घरच्यांनी आधीच सांगीतलेले
ते न ऐकल्याने स्वत:चाच राग थोडा आला.
कार्यक्रम संपवुन निघावे एकदाचे वाटले,
कारण ’शांत बसणे’ जमले नाही जन्मात
पण, यावेळेस तासभर शांत बसण्याचा रेकोर्ड नवा झाला.
’कांदा पोहे’ संपन्न झाला.
अन वाटले मला,
जणु हल्ला माझ्या ’उनाड’ स्वातंत्र्यावर झाला.
थंडी
ऊन कोवळं असलं तरी
थंडीला धुक्याच्या मागे लपताना पाहीलंय.
कधी कधी सुर्यालाही जळताना पाहीलंय.
अंगणात माझ्या बागडताना पाहीलंय,
धुक्याने हळुच मिठीत घेतल्यावर
लाजुन थंडीला ’गुलाबी’ होताना पाहीलंय.
भिडताच नजर डोळ्यांचे झुकणे.
कधी नजरेआड होता,
होऊन वेडेपीसे शोधणे.
नाक हलकेच मुरडणे.
पाहुन मी हसता,
दात ओठांत रुतणे.
सारे प्रेमाचे बहाणे.
मज वेड लाऊन जाई,
तुझे दुरुन पाहणे
“देशील का मला आयुष्यभर साथ ?”
झुकलेले तुझे डोळे नी
गुलाब देणारा तुझा थरथरनारा हाथ.
माझा तो नकार,
हसण्याचा तुझा प्रयत्न नी
भिजलेले डोळे तुझे चुकार.
शेवटचं म्हणुन
मागीतलेलं तुझं एक मागणं,
“आयुष्यभर तर नाहीस, देशील मज तु
सावरायला जमत नव्हते.
आईची माया होती,
आजीची आशा.
वडीलांचा आधार होता,
अन आजोबांची मनीषा.
जड झालं होतं अंत:करण,
निघायच्या विचाराने भरुन आलं होतं मन.
ओल्या डोळ्यांनी आई होती म्हणाली
शिक्षणासाठी उंबरठा ओलांडताना…
…कधी मागे वळु नकोस
आयुष्यात पुढं चालताना !!!
एक तुझ्यासाठी… एक माझ्यासाठी… !!
जणु तुझ्या मनातले माझे रेशीमबंध.
एक तुझ्यासाठी… एक माझ्यासाठी… !!
मी तुझ्या ग कुशीत,
श्वास रुतला श्वासात.
ओठ भिडले ओठाला,
केवढा काहुर तो मनात.
तुझे गरम उसासे,
तनी पेटवे वनवा.
मी विरघळलो तुझ्यात,
जणु कापुर जळावा.
तुझी कोमल ग कांती,
त्याला हलकासा सुगंध.
उर भरुन श्वास,
करी मजला बेधुंद.
आता राहवेन मज,
थांबव तुझा हा लाडिवाळ.
ऎन रंगात आपला
आला मिलनाचा खेळ
एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस - याला विचारले ......
' ए आपण असे कसे रे
ना रंग , ना रूप ,
नेहमीच चिडीचुप ,
आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर ,
दु : खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर ,
कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला ,
किनारा ही नाही साधा या पापण्याला ............
दुस - यालाही मग जरा प्रश्न पडला ,
खुप विचार करून तो बोलला ,
रंग - रूप नसला तरी ,
चिडीचुप असलो जरी ,
आधार आपण भावनांचा ,
आदर राखतो वचनांचा ,
सान्त्वनांचे बोल आपण ,
अंतरीही खोल आपण ,
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे ,
दु : खाच्या प्रसंगी आपलेच महत्व ,
आपल्याला नाही कोणी थांबवु शकत ,
बंधनात नाही कोणी बंधवु शकत ,
उद्रेक आपण मनातील वेदनांचा ,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा ,
भावबंध ह्र्दयातील रुदनांचा ,
स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा ,
म्हणुनच ,
आपले बाहेर पड़णे भाग आहे ,
आपल्यामुलेच आज हे जग आहे .
अशीच आपली कहाणी .........
ऐकून ही अश्रुची वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी .........................
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेल !!
पुरे झाले सुर्य चंद्र, पुरे झाल्या तारा,
पुरे झाले नदीनाले, पुरे झाला वारा
जाळासारखा नजरेमध्ये नजर बांधून पहा,
सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा
शेवाळलेले शब्द अन यमक छंद करतील काय?
डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय?
उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत,
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय?
शेवाळलेले शब्द अन यमक छंद करतील काय?
म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापुर्वी वेळ,
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुध्दा आभाळात पोचलेलं
शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस,
बुरुजावरती झेंड्या सारखा फडकू नकोस
उधळून दे तुफान सारं काळजामध्ये साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेल!
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात?
असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे !
तरीसुद्धा, तरीसुद्धा
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं;
उर्दूमध्ये इष्क म्हणून प्रेम करता येतं;
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;
कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं !
सोळा वर्षं सरली की अंगात फुलं फुलू लागतात,
जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात !
आठवतं ना, तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती
होडी सगळी पाण्याने भरली होती !
लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो,
होडीसकट बुडता बुडता वाचलो होतो !
बुडालो असतो तरीसुद्धा चाललं असतं,
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !
तुम्हाला ते कळलं होतं, मलासुद्धा कळलं होतं !
कारण,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
प्रेमबीम झूट असतं, म्हणणारी माणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं, मानणारी माणसं भेटतात !
असाच एक जण चक्क मला म्हणाला,
“आम्ही कधी बायकोला फिरायल नेलं नाही;
पाच मुलं झाली तरी प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही !
आमचं काही नडलं का? प्रेमाशिवाय अडलं का?”
त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हटलं,
“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं !”
तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने,
एक चॉकलेट अर्धं अर्धं खाल्लं असेल गोडीने !
भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन् तास फिरला असाल,
झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल !
प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !!
दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं !
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
माणूस केलंत तुम्ही मला!
इतकं दिलंत,
इतकं दिलंत
इतकं दिलंत तुम्ही मला!
खरं सांगतो,
माणूस केलंत तुम्ही मला!
पावसाळ्यात तर
वर्षावाला मिती नव्हती;
माझी ओंजळ
कधीसुद्धा रिती नव्हती!
पण कधी उन्हाळ्याच्या वणव्यातही
तुमचं प्रेम सरी झाल्या,
मला शोधत घरी आल्या!
इतकं दिलंत….
तसा मी माझ्यातच गुंग होतो,
स्वतःभोवती फिरण्यातच दंग होतो,
मीच माझ्या खुशीचा रंग होतो
तरी तुम्ही मानून घेतलत,
माझं मन जानून घेतलत!
इतकं दिलंत…..
भिऊन माझ्या सावलीला
पळत होतो,
नको त्या वळणावर वळत होतो,
एकलेपणात हताश होऊन
जळत होतो….
तुम्ही मला भिजवलंत,
हिरवगार रूजवलंत !
इतकं दिलंत….
तुमचं प्रेम स्मरून इथून जाताना
तुमच्या मायेत
चिंब भिजून न्हाताना,
तुमच्या समोर
उभं राहून गाताना,
मन असं भरून येतं
डोळ्यातून झरून येतं !
डोळ्यात जेव्हा आसवं असतात
तेव्हाच माणसं माणसं असतात !
इतकं दिलंत,
इतकं दिलंत
इतकं दिलंत तुम्ही मला!
खरं सांगतो,
माणूस केलंत तुम्ही मला!
मी मरेन तेव्हा, दोन क्षण मौन पाळशील का?
एकान्तात का होइना,
पण माझ्यासाठी,
दोन अश्रु गाळशील का?
जन्मभराची साथ,
नाही मिळाली तरी चालेल;
पण माझ्या शवयात्रेत,
तू दोन पावलं चालशील का?
मी मरेन तेव्हा, दोन क्षण मौन पाळशील का?.....
माझ्यासाठी तू,
कोमेजली नाहीसच कधी;
शेवटी माझ्यावर,
तू दोन फुलं उधळशील का?
मी मरेन तेव्हा, दोन क्षण मौन पाळशील का?.....
विचार करायला,
उसंत मिळाली तर्;
माझ्या आठवणी कधी,
उराशी कवटाळशील का?
मी मरेन तेव्हा, दोन क्षण मौन पाळशील का?.....
माझ्या नावाचं मंगळसुत्र,
तिन नाही घातलं तरी;
माझ्यासाठी एक दिवस,
ती वैधव्य पालेल का ?
मी मरेन तेव्हा, दोन क्षण मौन पाळशील का?.....
तु परत येऊ नकोस
तु परत येऊ नकोस,
जुन्या आठवणी जागवायला,
आधीच खुप दिवस लागलेत,
मनावरील जखमा भरायला.....
दुःख अंतरी दाबुन,
एकांतामध्ये रडत असतो,
म्हणुनच का कोणास ठावुक,
सर्वांसोबत हसत असतो.....
तु आयुष्यात परत येऊ नकोस,
तुझे स्थान मिळवायला,
आधीच फार वेळ लागलाय,
त्या सर्व आठवणी विसरायला.....
पण...
काहीही असले तरी........
तुला शोधायला तरी,
नजर माझी फिरत असते,
आकाशीचा चंद्र पाहील्यावर,
तुझीच आठवण दाटुन येते......
तुला विसरण्याचा,
आत्ता कुठे मी प्रयत्न करतोय,
पण ही कवीता लिहीता लिहीता,
पुन्हा तुलाच गं मी आठवतोय...
काही दिवसांपुर्वीचे अपरीचीत आपण
लगेच कसे ओलखीचे झालो
वाटसरु आपण वेगळेवेगळे
आता सहजिवनाचे सोबती झालो...
निरगस तुझे बोलके डोळे
वेड मजसी लाउन गेले
भिडता नजर एकमेंकाशी
पापण्यानी स्वत:स जुळवुन दिले...
मनमोकळा तुझा हसरा स्वभाव
जिवास मझ्या खुप भावला
समजणेच न मला आता
मज लळा तुजा कसा लगला ???
देशील न साथ मज मरणोत्तर सुध्धा?
वचन मागतोे मी...
न चुकता करावा तुला फोन
मग,उगाच तु चेष्टा करुन बोलावं
बोलता-बोलता असाच वेळ निघुन जावा...
याक्षणी आठवतेस तु...
फोने हाती घेतल्यावर बघाव
तु पाठवलेला जुनाच एखादा 'मेसेज'
बघुन मग असाच विचार करत बसाव...
याक्षणी आठवतेस तु...
एखादया दिवशी पहावी वाट
करशील तु फोन म्हणुन,तुज़ मात्र
वेळ नाही बोलु आपण नतंर...
याक्षणी आठवतेस तु...
तुझ नेहमीच खट्याळ बोलणं
माझ मात्र नेहमीच तुला रागावणं
पण तरीही तुझं शांत बसणं...
याक्षणी आठवतेस तु...
मित्र म्हणुन काय नाही केलस तु
माझं मात्र 'मी असाच आहे'
पण तरीही सागण्याचा तुझा प्रयत्न असणं...
याक्षणी आठवतेस तु...
नेहमीच तुझं प्रेमानं बोलणं
मझं मात्र नेहमीच टोचुन बोलणं
तरीही तु एकुन घेण्याच मोठेपण असणं...
याक्षणी आठवतेस तु...
डोळ्यातील अश्रुही थांबेना आज
रुसलेत तेही माझ्यावर
मी ही अश्रुची चादर पाघंरणार मनावर...
याक्षणी आठवतेस तु.. .
कि माझ्या आयुष्यात येणारी
माझ भाग्य ठरवनारी कशी असावी
ती सुंदर रूपवती नस्ली ज़री
तरी सुंदर विचार करणारी असावी
दृष्टि दोशामुले चश्मा असला ज़री
चांगला दृष्टिकोण ठेवणारी असावी
नोकरी केलि किव्वा नही तरी
संसाराकडे बारीक लक्ष्य देणारी असावी
यशामधे माला ठेवेल ज़मिनिवारी
अपयाशात आत्मविश्वास वाढवनारी असावी
माझे आई-बाबा सासू-सासरे असले ज़री
त्याना स्वतः चे आई-बाबांचे प्रेम देणारी असावी
दुःखाचे सावाट कधी ओढ़ले ज़री
माझी सावली बनून राहणारी असावी
आयुष्य लाम्ब असल ज़री
माझ्या जगण्याला कारण देणारी असावी
तुमचा काय विचार आहे????
इंग्रजीच्या नादापाई झाला मराठीचा डब्बा गोल
मराठी माणसा आता तरी तू मराठीतून बोल...
इंग्रजीच्या पेपरात होऊन जाते वर्ग सारा पास
पण मराठीचा पोरगा होतो मराठीत नापास...
प्रेम करतो तुझ्याशी म्हटले की पोरगी समजते शेंबडा
अन आय लव यु म्हटल्यावर मनात मारते उड्या...
माय झाली मॉम आणि बाप झाला आता ड्याड
रेव्ह पार्टीत नाचून श्यान पोर झाली मॅड...
भांडण करते बायको घरात बाबुला इंग्रजी शाळेत टाका
मराठी माणसापासून आहे खरा मराठी भाषेला धोका...
मराठी इसरत चालल शाळेतले शिक्षण
मराठी औक्सीजनवर अन चालू आहे इंग्रजीचे रक्षण...
ज्ञानोबा तुकोबाची अभंगवाणी, आठवा मराठीचा गोडवा
मराठी माणसाचे नवीन वर्ष म्हणजे असतो गुडी पाडवा...